‘पद्मावती’चा वाद एकीकडे चांगलाच तापलेला दिसतो पण सिनेमाचा मुख्य अभिनेता रणवीर सिंगला मात्र त्याची काहीच चिंता नसल्याचे दिसते. नुकताच तो ‘रेस 3’ सिनेमाच्या सेटवर कलाकारांना भेटायला पोहोचलेला. सेटवर तो सलमानची पाठ दाबून देताना दिसला. यावेळी त्याने दिग्दर्शक रेमो डिसुझा आणि निर्माते रमेश तौरानी यांच्याही भेट घेतली. या चौघांनी मिळून ‘रेस 3’ च्या सेटवर फार मस्तीही केली.
रमेश तौरानी यांनी सेटवरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत म्हटले की, रणवीर सिंग ‘रेस 3’ च्या सेटवर आलाय. ‘तो जेव्हाही सेटवर येतो तेव्हा सेटचे वातावरण फारच आनंदी होते. ट्विटर पेजवरुन रणवीर सलमानची पाठ चेपून देतानाचा एक फोटो शेअर केला. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी लिहिले की, ‘एक कलाकारच दुसऱ्या कलाकाराचे कष्ट समजू शकतो. ‘रेस 3’ सिनेमात सलमान खान, जॅकलीन फर्नांडिस, बॉबी देओल आणि डेसी शाह यांच्या मुख्य भूमिका आहेत.पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर ‘रेस 3’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा ‘फन्ने खान’ हा सिनेमादेखील त्याचवेळी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफीसवर या दोन्ही सिनेमांत स्पर्धा रंगणार आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews